एकल महिला पाल्यांना शालेय साहित्याची भेट

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील साऊ एकल महिला संस्थेच्या आवाहनास प्रतिसाद देत डॉ.सुनील शिंदे यांनी एकल महिला पाल्यांसाठी शालेय साहित्य भेट दिले.

साऊ एकल संस्थेच्या कार्यकारी संचालिका प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत डॉ.शिंदे यांनी वह्या तसेच शैक्षणिक वस्तूंचे वितरण केले. शिक्षणाच्या प्रवाहात वंचित, उपेक्षित घटकांसह एकल महिलांच्या पाल्यांची शैक्षणिक शुल्कासह शालेय वस्तूंची होणारी परवड लक्षात घेता सामाजिक जाणीवेच्या भावनेतून शालेय वस्तू देण्यात याव्यात असे आवाहन साऊ एकलच्या प्रतिमा कुलकर्णी यांनी समाजातील घटकांना केले होते.

Visits: 156 Today: 3 Total: 1100163
