लोहगाव येथील मंदिराची दानपेटी अज्ञातांनी फोडली

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील लोहगाव येथील मारुती मंदिर-भारतीबाबा समाधी परिसरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 30 हजाराची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता.29) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली आहे. दानपेटी फोडण्याबरोबरच चोरट्यांनी भजनी मंडळ साहित्य ठेवण्याच्या ठिकाणची खोलीचेही कुलूप त्रिशूळ घालून तोडले व साउंड सिस्टीमचे नुकसान करत दोन कॉडलेस माईक लांबिवले आहे.

सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी आलेल्या भजनी मंडळी व दिवाबत्ती करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. सदर घटनेची माहिती सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना देण्यात आली. या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा, अशी मागणी लोहगाव ग्रामस्थांच्यावतीने सरपंच आदिनाथ पटारे, उपसरपंच निसार सय्यद, बापूराव कल्हापुरे, जालिंदर ढेरे, अण्णा ढेरे, विकास ढेरे, पोलीस पाटील सोपान ढेरे, सीताराम रावडे, जालिंदर महाराज ढेरे, सुखदेव महाराज ढेरे, दिनकर नागदे, नवनाथ ढेरे, गणेश सिकची आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.

Visits: 103 Today: 3 Total: 1112845

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *