मैड डेंटल केअर क्लिनिकच्या मोफत दंत तपासणी शिबीराला उत्तम प्रतिसाद


नायक वृत्तसेवा, साकुर
पारनेर तालुक्यातील प्रति पंढरपूर समजल्या जाणार्‍या पळशी येथे आषाढी एकादशी निमित्त संगमनेर येथील मैड डेंटल केअर क्लिनिक अँड इंप्लांट सेंटरच्या वतीने आयोजित मोफत दंत तपासणी, क्ष-किरण तपासणी तसेच मोफत उपचार शिबिराला या परिसरातील रुग्णांनी उत्तम प्रतिसाद दिला.


या मोफत शिबिरात डॉ. सागर मैड, डॉ. कांचन मैड, डॉ. साई, डॉ. प्रशांत, डॉ. सायली, डॉ. नूर, डॉ. आतार तसेच सिस्टर अनिता, ठुबे बाबा, जागृती, प्रतीक्षा यांनी विविध रुग्णांच्या दातांची तपासणी केली. प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळशी येथे दरवर्षी अनेक भाविक आषाढी एकादशीला दर्शनास येतात. या निमित्ताने ‘सेवा परमो धर्म’ या भावनेला जागुन डॉ. सागर मैड यांनी मोफत दंत तपासणी व क्ष-किरण तपासणी तसेच त्यावरील मोफत उपचार या माध्यमातून वारकर्‍यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमारे ७७ रुग्णांची दंत तपासणी करून यातील २५ जणांवर मोफत दंत उपचार करण्यात आले. या उपक्रमास मंदिर ट्रस्ट अध्यक्ष जाधव तसेच नियोजक गणेश हाके यांनी सहकार्य केले.

Visits: 120 Today: 1 Total: 2129102

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *