शैक्षणिक पालकत्व योजनेचा शुभारंभ


नायक वृत्तसेवा, अकोले
एकल महिलांच्या मुलांना केवळ शैक्षणिक मदत न देता, त्यांचे शैक्षणिक पालकत्व समाजातील विविध व्यक्तींना देण्याची अभिनव कल्पना साऊ एकल महिला समितीच्या वतीने अकोल्यात राबवण्यात आली. या संकल्पनेला अकोल्यातील नागरिकांनी खूप प्रतिसाद दिला.


२५० विद्यार्थ्याचे पालकत्व यात स्वीकारण्यात आले. या विद्यार्थ्यांना एक गणवेश, स्कूल बॅग, कंपास,वह्या, जेवणाचा डबा, पाणी बाटली देण्यात आली. या पालकत्व प्रकल्पाला संवेदना नाव देण्यात आले आहे व यातून समाज या प्रश्नाची जोडण्याचा हा प्रयत्न असल्याचे साऊ एकल महिला समितीच्या प्रतिमा कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी लेखक शांताराम गजे, पुष्पा लहामटे, नीता आवारी, उमेदचे कुंदन कोरडे, अ‍ॅड. वसंत मनकर, नगरसेवक प्रतिभा मनकर, सरपंच अनुप्रिता शिंदे, ललित छल्लारे, सुनील शेळके, रेखा धर्माधिकारी, मनोज गायकवाड, प्रकाश टाकळकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सचिन लगड, हरिभाऊ फापाळे, अक्षय आभाळे, सुभान शेख उपस्थित होते.

११०० रुपये देणारे समाजातील कुटुंब निवडून त्यांना एकल महिलांचे पाल्य दत्तक देण्यात आले. वर्षभर निवडलेले हे शैक्षणिक पालक या एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतील व चौकशी करतील. रक्षाबंधन, दिवाळी सणाच्या निमित्ताने कुटुंबाला भेट देतील. यातून समाजाला एकल महिलांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अनाथ विद्यार्थ्यांना कुटुंब स्नेह देण्याची ही यामागची भावना आहे.

Visits: 133 Today: 1 Total: 1109328

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *