वसुंधरा अकॅडेमीत आंतरराष्ट्रीय योग दिन

नायक वृत्तसेवा, अकोले
योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. प्राचीन योगविद्येचा हा समृद्ध वारसा भारताला मिळाला व भारताकडून संपूर्ण जगाला मिळाला. जगभरातील लोकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन वसुंधरा अकॅडमीच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी केले.

प्रत्येक विद्यार्थ्याने आरोग्य संपन्न व्हावे, निरोगी जीवन जगावे व योगविद्येचा मिळालेला समृद्ध वारसा लक्षात घेऊन आपल्या जीवन पद्धतीत प्राणायाम, योगासने यांचा समावेश करावा या उद्देशाने अभिनव शिक्षण संस्था संचलित वसुंधरा अकॅडमीत सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंतरराष्ट्रीय योग कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी वसुंधराच्या योगशिक्षिका वर्षा गोडे, क्रीडा शिक्षक गोरक्षनाथ पोपेरे, सचिन बोंबले, ब्लू हाऊसच्या हाऊस मास्टर कल्पना मंडलिक व उज्वला मुसळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख, उपप्राचार्या राधिका नवले, ज्येष्ठ शिक्षक प्राजक्ता नेटके, वृषाली शेटे, सुनील खताळ व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सर्वांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात विशेष सहभाग घेतला.

Visits: 127 Today: 3 Total: 1104916
