डॉ. मुटकुळेंचा ग्राहक संरक्षण समितीकडून सत्कार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील ग्राहक संरक्षण समितीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सोमनाथ मुटकुळे यांना औरंगाबाद येथील साहिल गंथ संस्थेच्यावतीने ‘कला गौरव’ पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आलेले आहे. याबद्दल ग्राहक संरक्षण समितीने डॉ. मुटकुळे यांचा यथोचित सत्कार केला आहे.


याप्रसंगी नाट्य कलाकार सूर्यकांत शिंदे, वसंत बंदावणे, डॉ. किशोर पोखरकर, दैनिक नायकचे संपादक गोरक्षनाथ मदने, बाळासाहेब राऊत, राजेंद्र नवले, बाळासाहेब घुले, शांताराम डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी डॉ. मुटकुळे यांच्या कार्याचा आढावा विशद केला. या सत्कारामुळे ग्राहक संरक्षण समितीची जबाबदारी अधिक वाढल्याचे डॉक्टर मुटकुळे यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Visits: 401 Today: 1 Total: 2166980

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *