डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जींना शहर भाजपाच्या वतीने अभिवादन

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि राष्ट्रभक्त नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या ७२ व्या बलिदान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी संगमनेर शहराच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शहर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  शहराध्यक्षा पायल आशिष ताजणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुखर्जी यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करीत, देशाच्या एकतेसाठी त्यांनी दिलेलं योगदान यावर भाष्य केलं.यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्वच आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘एक देश में दो विधान, दोन प्रधान और दो निशान नही चलेंगे’या ब्रीदवाक्यावर  प्रखरपणे भुमिका मांडणारे मुखर्जी प्रगल्भ नेते होते, ते खऱ्या अर्थाने भारतमातेचे पूत्र होते. त्यांचं बलिदान आजच्या पिढीला राष्ट्रनिष्ठा आणि कर्तव्यभावना शिकवत असल्याचे शहर भाजपाच्या अध्यक्षा पायल ताजणे यावेळी म्हणाल्या.
Visits: 69 Today: 1 Total: 1104050

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *