शहर भाजपच्या वतीने योग शिबिर उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर भाजपच्या वतीने शनिवारी सकाळी  शहरातील मातोश्री लाॅन्स येथे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपच्या शहराध्यक्षा पायल ताजणे यांच्या उपस्थितीत सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘२०२५ या वर्षाचे ध्येय वाक्य ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या माध्यमातून योग दिनी  प्रत्येकाने योग शिबिरात सहभागी होऊन योगा जाणुन घेऊन तो दैनंदिन जीवनात अंमलात आणण्यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही  योगा शिबिरात सहभागी होण्यासाठी  आवाहन केले होते, या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.योग गुरु प्रशिक्षक कैलास कानवडे  यांनी सहभागी विद्यार्थी आणि नागरिकांना विविध योगासने आणि प्राणायामाचे तांत्रिक मार्गदर्शन केले. योग माध्यमातून शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारता येते, असे त्यांनी सांगितले.
Visits: 31 Today: 2 Total: 638582

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *