शरीराने दिव्यांग, मनाने नाही,सौराष्ट्र क्रिकेट संघाची पहिल्याच सामन्यात बाजी

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
आपण जरी शरीराने दिव्यांग असलो तरी कुठल्याही क्षेत्रात कमी पडत नाही हे दिव्यांग बांधवांनी दाखवून देत क्रिकेट सारख्या स्पर्धेत सहभाग घेऊन दिव्यांगावर मात करत क्रिकेट खेळू शकतो हे दाखवून देण्याचे काम महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेतून दिव्यांग बांधवांनी दाखवून दिले. या स्पर्धेत पहिला सामना महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा झाला, या वेळी १५ षटकारामध्ये १२७ धावा करत सौराष्ट्र क्रिकेट संघाने बाजी मारली आहे.
महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीने मंगळवारपासून तीन दिवस संगमनेर नगरपालिकेच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात राज्यस्तरीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ झाला. या दिव्यांग क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात, बडोदा आणि सौराष्ट्र या चार नामांकित संघांनी  सहभाग घेतला असून, एकूण सात सामने खेळवले जाणार आहेत.
दिव्यांग खेळाडूंना मार्गदर्शन करताना आमदार अमोल खताळ म्हणाले की,  संगमनेरसारख्या ग्रामीण भागात अशा प्रेरणादायी स्पर्धेचे आयोजन होणे हे आमच्या शहरासाठी गौरवाची बाब आहे. मी या अगोदर कधीच दिव्यांग क्रिकेट सामना पाहिला नव्हता, पण आज तुमचा आत्मविश्वास आणि जिद्द पाहून मी सुद्धा  भारावून गेलो असल्याचे आ. अमोल खताळ यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष भगवान तलवारे, उपाध्यक्ष प्रशांत म्हाळसकर, भारतीय दिव्यांग क्रिकेटपटू जमीर पठाण, कॅप्टन मोसिन शेख, उपकर्णधार नितीन वाबळे, आयोजक निलेश भिंताडे, अनु आनवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना  महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या दोन दिव्यांग बांधवांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळण्यात आला. या सामन्यात सौराष्ट्र संघाने १५ षटकांत १२७ धावा करत दमदार सुरुवात केली. हे दिव्यांग बांधवांचे सामने पाहण्याची संगमनेरकरांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. त्या संधीचा संगमनेरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या १५०० रुपयांचे अनुदान तसेच रेशन कार्ड धारक दिव्यांगांसाठी योग्य यादी तयार करून मदत दिली. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी आपला कायम मदतीचा हात असतो. तुम्ही यावर्षी ही स्पर्धा आयोजित केली,याहीपेक्षा पुढील वर्षी दिव्यांग बांधवांची क्रिकेट स्पर्धा एकदम चांगली होईल त्यासाठी क्रीडांगण प्रत्येक वर्षी उपलब्ध करून दिले जाईल असा शब्द आ. अमोल खताळ यांनी यावेळी दिला.
Visits: 76 Today: 1 Total: 1113421

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *