पूल कोसळण्याचे श्रेय काँग्रेसने घ्यावे : पायल ताजणे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
म्हाळुंगी नदीचा पुल कसा, कोणाच्या कसरतींमुळे कोसळला हे सर्व संगमनेरच्या जनतेला माहिती आहे.पुल कोसळण्याचे श्रेय कॉग्रेसने पोसलेल्या ठेकेदारांचे आहे, याचे श्रेय कॉग्रेसने घ्यावे, पुल तयार करण्याचे श्रेय केवळ आणि केवळ पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचेच असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा पायल ताजणे यांनी केले.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाठपुरावा करून म्हाळुंगी पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला.पालकमंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार अमोल खताळ आणि भाजपा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी लक्ष ठेवून काम वेळेवर पूर्ण कसे होईल यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे आणि ठेकेदारांकडे पाठपुरावा केला त्यामुळे हा पूल पूर्णत्वास गेल्याचे पायल ताजणे यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून संगमनेरच्या वैभवात भर घालणाऱ्या व लोकांची गैरसोय दूर करणाऱ्या म्हाळुंगी पुलाचे आ.अमोल खताळ यांच्या हस्ते लोकार्पण करून संगमनेर भाजप महायुतीच्या व संगमनेरकरांच्या वतीने विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले, याप्रसंगी भाजप महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर पुलाचे लोकार्पण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. परिणामी जनतेची आणि शाळकरी विद्यार्थ्याची गैरसोय दूर झाली. त्यामुळे संगमनेर कॉग्रेसने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी खोट्या श्रेयवादात न अडकता जनतेची आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करणारे पालकमंत्री विखे पाटील यांचे आभार मानले पाहिजेत असेही पायल ताजणे यांनी म्हटले आहे.

Visits: 54 Today: 1 Total: 1102058
