सायकलवर तब्बल अकरा वेळा केली नर्मदा परिक्रमा पूर्ण! महंत गोपालानंदगिरी महाराजांचा संत-महंतांच्या हस्ते गौरव


नायक वृत्तसेवा, नेवासा
सायकलवर सलग अकरावेळा पवित्र समजली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल नेवासा तालुक्यातील हंडीनिमगाव शिवारात असलेल्या मुक्ताई आश्रमाचे प्रमुख महंत गोपालानंदगिरी महाराज यांचा संत-महंतांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रम प्रसंगी श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, मातापूर येथील स्वामी माधवानंदगिरी महाराज, पांढरीपूल येथील स्वामी राजेश्वरानंद महाराज, नेवासा येथील मध्यमेश्वर देवस्थानचे बालयोगी महंत ऋषीनाथ महाराज, अकोळनेर येथील महंत स्वामी जिज्ञासानंद सरस्वती महाराज, करंजी येथील स्वामी सुदर्शननाथ महाराज, स्वामी रामानंदपुरी महाराज, घोगरगाव येथील स्वामी विश्वनाथगिरी महाराज, पैठण येथील साध्वी सुवर्णानंद चैतन्य, स्वामी अमृतानंद सरस्वती अकोळनेरकर, साध्वी अर्चनानंदगिरी महाराज, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, संभाजी महाराज पठाडे, महादेव पाटेकर, संदीप काळे, किशोर सुकाळकर यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याबरोबरच मुक्ताई माता महिला मंडळ व श्री संत गोरोबा काका प्रतिस्थान व मुक्ताई माता भक्त परिवाराच्यावतीने महंत गोपालगिरी महाराजांचा व सर्व संत-महंताचा सन्मान करण्यात आला. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित कन्यांचे पूजन महंत गोपालानंदगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महंत गोपालानंदगिरी महाराजांनी सायकलवर केलेल्या नर्मदा परिक्रमावरील आलेले अनुभव सांगताना सलग अकरा वेळा ही यात्रा भगवंताने माझ्याकडून करून घेतली याबद्दल देवाचे आभार मानले. भाविकांना महाप्रसाद देऊन संतपूजन सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली.

Visits: 206 Today: 1 Total: 2057162

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *