एसएमबीटीत आज पोट विकार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरानजीकच्या घुलेवाडी येथील एसएमबीटी क्लिनिक येथे आज शुक्रवार दि.१३ जून रोजी पोटविकार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आज शुक्रवारी सकाळी १० ते २ यावेळेत हे शिबिर पार पडणार असून मोफत नाव नोंदणी केली जाणार आहे. यावेळी तज्ञ गॅस्ट्रो इंट्रोलॉजिस्ट यांचा मोफत सल्ला रुग्णांना दिला जाईल. त्याचबरोबर अल्प दरात एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी,ईआरसीपी व इतर चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच पोटाच्या सर्व समस्या जसे, पोटामध्ये वेदना होणे, गिळायला त्रास होणे, गिळता न येणे, अचानक वजन कमी होणे, भूक कमी लागणे, छातीमध्ये व पोटामध्ये जळजळ होणे, वारंवार अतिसार (डायरिया) होणे, बद्धकोष्टता, कावीळ, काळी संडास, संडासातुन रक्त येणे, पित्ताशयातील खडे व पित्त नलिकेतील खडे, यकृताचे विकार, स्वादुपिंडाचे विकार, पोटातील आतड्याला सूज येणे, उलट्या व रक्ताच्या उलट्या होणे आदी आजारांवर व समस्यांवर खात्रीशीर उपचार होणार आहेत.

या शिबिरात उपस्थित राहणाऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच नामांकित कंपन्यांची औषधे सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.

Visits: 117 Today: 1 Total: 1102118
