भुतांबरे व गावडे कुटुंबाला किराणा किटचे वाटप

नायक वृत्तसेवा, साकुर
संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथील सुनील पांडुरंग भूतांबरे व किरण पाराजी गावडे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. ही माहिती कळताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मयतांच्या कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.

भूतांबरे व गावडे कुटुंबांना किराणा किट देण्यात आली. यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सरपंच राहुल गंभीरे, माजी सरपंच लक्ष्मण गीते, नामदेव भूतांबरे, अर्जुन गावडे, गंगुबाई भूतांबरे, गीताबाई भूतांबरे,नवनाथ गंभीरे, रोहिदास नागरे, सोनाली भुतांबरे,पाराजी गावडे,अक्काबाई गावडे, मीराबाई गावडे, उपसरपंच पोपट पचपिंड, संदीप पचपिंड, भाऊसाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांनी तालुका हा कुटुंबाप्रमाणे मानला असून त्यांनी सातत्याने गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना नेहमी मदत केली आहे. याचबरोबर तालुक्यातील गाव आणि वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड, कार्यालयीन अधीक्षक रामदास तांबडे यांनी भूतांबरे व गावडे कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले.या अपघाताच्या दुःखद घटनेची माहिती मिळताच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनीही या दोन्ही कुटुंबाची सांत्वन्पर भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासमवेत शंकर खेमनर,संचालक विलास शिंदे, उपसरपंच राहुल गंभीरे, लक्ष्मण गीते, उपसरपंच पोपट पचपिंड, संदीप पंचपिंड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 147 Today: 4 Total: 1107004
