चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस एक वर्षाने अटक

नायक वृत्तसेवा, देवळाली प्रवरा
तरुणास मारहाण करून लूटल्याच्या गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार असलेल्या आरोपीच्या राहुरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली.

ताहाराबाद येथील इंडियन आईलच्या पेट्रोलपंपावरून पेट्रोल भरून फिर्यादी गावाकडे जात होता. त्यावेळी आरोपी अविनाश भिकन विधाते (वय २९, रा. ताहाराबाद) याने त्यास मोबाईल खाली पडल्याचे सांगितले. त्यामुळे फिर्यादी व साक्षीदार थांबले असता, आरोपी विधाते त्यांच्याकडे गेला व शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या खिशातून १७ हजार रुपये असलेले पैशाचे पाकीट घेऊन तेथुन दुचाकीवर पळून गेला. याबाबतच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. २९ जून २०२४ पासून या घटनेतील आरोपी अविनाश भिकन विधाते फरार होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस हेड कॉन्स्टेबल जानकीराम खेमनर, रामनाथ सानप, पोलिस अंमलदार अविनाश दुधाडे यांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. राहुरी न्यायालयाने आरोपीस पोलिस कोठडी सुनावली. घटनेचा पुढील तपास पोलिस जानकीराम खेमनर करत आहेत.

Visits: 65 Today: 2 Total: 1103046
