राहात्यातील सपना जनरल स्टोअर्सचे शटर उचकटून चोरी

नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातून जाणार्‍या नगर-मनमाड महामार्गाच्या बाजूला व सराफ बाजारालगत असलेल्या सपना जनरल स्टोअर्सचे रविवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून रोख रक्कम व साहित्य मिळून सुमारे आठ हजार रुपयांची चोरी केल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

सध्या राहाता शहरात भुरट्या चोर्‍या, दुकान फोडी व गाड्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर सपना जनरल स्टोअर्सचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करून रोख रक्कम सुमारे चार हजार रुपये व चांदीचे नाणे असा मिळून आठ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. तसेच शहरातून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाणही वाढल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Visits: 134 Today: 1 Total: 1978813

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *