नायक वृत्तसेवा, शिर्डी 
महिलांसाठी संधींचा अभाव आणि स्वतःचा पुढाकार पुरुषांच्या तुलनेत संधी कमी आहेत.म्हणूनच महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपली ओळख आणि कार्यक्षमता स्पष्ट करणे गरजेचे आहे.हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी आवश्यक  असल्याचे  मत व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा सारिका पन्हाळकर यांनी व्यक्त केले.
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक पावन भूमीत आयोजित  राज्यस्तरीय कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करताना  पन्हाळकर बोलत होत्या, त्यापुढे म्हणाल्या की, स्त्रिया विविध जिल्ह्यांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत असल्या तरी त्यांना अपेक्षित प्रमाणात मीडिया कव्हरेज व प्रोत्साहन मिळत नाही. फेसबुक, यु ट्युब यांचा अधिक परिणामकारक वापर शिकवणे आवश्यक आहे.महिलांनी रिल्स, व्हिडिओ स्वतःच्या विचारांनुसार तयार करावेत. योग्य,चुकीचं याच्या कल्पनेत न अडकता सर्जनशीलता व्यक्त करावी  आय टी जगतात वेळ वाया घालवण्याऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं काम प्रभावीपणे मांडण्यावर भर द्यावा.हुशारी पुरेशी नाही, कृती हवी हे लक्षात घेणे गरजेचे आहे.फक्त लिहिणं नव्हे, तर प्रेझेंटेशन, कम्युनिकेशन, लीडरशिप, ड्रेसिंग, आणि मांडणी कौशल्य यांवरही भर दिला पाहिजे.माझ्या आईने,बहिणीने इतकं केलं, मी काय केलं पाहिजे? असा विचार जागवणं हे मुख्य उद्दिष्ट आहे.महिला मीडिया लीडरशिप वर्कशॉप्स आयोजित करा. रिसर्च सेंटरच्या कल्पनेला मूर्त स्वरूप द्या.सोशल मिडिया ट्रेनिंग सत्रे रिल्स, पोस्ट, कन्टेन्ट रायटिंग  यावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग वाढवा.डिजिटल आणि व्यक्तिमत्व विकासासाठी वेबिनार चालू करा असे त्या म्हणाल्या.
सामाजिक संघटनांसोबत बैठक व संवाद वाढवा.मीडिया ट्रेनिंगसाठी बेस डॉक्युमेंट तयार ठेवा.महिलांचा आवाज आणि आत्मविश्वास  हे परिवर्तनाचे खरे साधन आहेत. स्त्रियांनी आपली उपस्थिती, विचार, आणि कार्य समाजासमोर ठामपणे मांडले तर त्यातून एक व्यापक सामाजिक परिवर्तन शक्य असल्याचे सारिका पन्हाळकर यांनी यावेळी सांगितले.