मूल्यसंस्कारच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य : दिघे

नायक वृत्तसेवा, श्रीरामपुर
बालसंस्कार व युवा प्रबोधन या विभागाच्या माध्यमातून सृजन व सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य होत असल्याचे गौरवोद्गार माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी काढले.

मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी केंद्र, गाव शाळा व वाडे, वार्ड, कॉलनी, अनाथलय, आश्रमशाळा, इत्यादी ठिकाणी बालसंस्कार वर्ग सुरु करून विद्याथ्यांना सर्वगुण संपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश इ. विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य बालसंस्कार व युवा प्रबोधन या विभागाच्या माध्यमातून सृजन व सुसंस्कृत पिढी घडविण्याचे कार्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने तसेच नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने सुरु आहे. दिंडोरी प्रणित सुतगिरणी केंदाच्या वतीने बालसंस्कार व युवा प्रबोधन विभाग एकदिवसीय जिल्हा व तालुकास्तरीय उन्हाळी मुल्यसंस्कार शिबीराच्या शुभारंभ प्रसंगी माजी बांधकाम सभापती बाबासाहेब दिघे बोलत होते. यावेळी दत्तनगरच्या सरपंच सारीका कुंकुलोळ, आशा दिघे, नमना शेवाळे, सुरेश शेवाळे उपस्थित होते.

या मूल्यसंस्कार शिबीरात तालुक्यातील मुठेवडगांव, महांकाळवडगाव, बोरावके नगर, नॉर्दनब्रॅच, समर्थ नगर, आंबी, उक्कलगांव, कुराणपुर, रासकर मळा, सावता केंद्र, वडाळा महादेव , वळद – उंबरगाव (भोसले वस्ती) या केंद प्रतिनिधींच्या माध्यमातून २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Visits: 92 Today: 2 Total: 1106883
