तालुक्यात कोरोनाचा कहर आजही सुरुच..! शहरातील तेरा जणांसह अडतीस रुग्णांची नव्याने पडली भर
शहरातील तेरा जणांसह अडतीस रुग्णांची नव्याने पडली भर
नायक वृत्तसेवा संगमनेर
संगमनेर तालुक्यात कोविड विषाणूंचा हाहाकार सुरूच असून आजही तालुक्याच्या रूग्णसंख्येत तब्बल 38 रुग्णांची भर पडली आहे. प्रशासनाने आज केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीसह खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील 13 तर तालुक्यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या तेरावे शतक ओलांडून 1 हजार 310 वर पोहोचली आहे.
आज खाजगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या बारा जणांच्या अहवालातून गणेशनगर परिसरातील 24 वर्षीय महिलेसह 23 वर्षीय तरुण, घासबाजारातील 80 वर्षीय वयोवृद्ध इसम, वडगावपान मधील 17 वर्षीय तरुण, प्रतापपूर मधील 66 वर्षीय इसम, आश्वी बुद्रुक येथील 50 वर्षीय इसम, राजापूरमधील 70 वर्षीय इसम, श्रीरामनगर परिसरातील 57 वर्षीय महिला, श्रमिकनगर मधील 47 वर्षीय महिला, गोल्डन सिटीतील 53 वर्षीय इसम, शिंदोडी येथील तीस वर्षीय तरुण, तर गुंजाळवाडीतील 41 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे.
यासोबतच प्रशासनाने केलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहर व तालुक्यातील 26 जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. त्यात बोटा येथून एक वर्षीय बालक, शहरातील काठेमळा परिसरातील 58 वर्षीय इसम व 17 वर्षीय तरुण तसेच 39 वर्षीय महिला व सहा वर्षीय बालिका, कऱ्हे येथील 65 वर्षीय, 19 वर्षीय महिला व वीस वर्षीय महिला, 38 वर्षीय व 21 वर्षीय तरुण तसेच 13 महिने वयाच्या बालकालाही संक्रमण झाले आहे.
ग्रामीण भागातील वेल्हाळे येथूनही सहा रुग्ण समोर आले असून तेथील 80 वर्षीय व 65 वर्षीय वयोवृद्धांसह 35 वर्षीय तरुण, 9 व तीन वर्षीय बालकांसह 35 वर्षीय महिला. कुरकुंडी येथील 45 वर्षीय तरुणाच्या रूपाने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. घुलेवाडीतील बारा वर्षीय बालक, शहरातील स्वामी समर्थ नगर येथील 54 वर्षीय इसमासह 24 वर्षीय तरुण व 49 वर्षीय व 25 वर्षीय महिला, खांबा येथील 25 वर्षीय तरुणी, वडगावपान येथील 40 व 23 वर्षीय महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याची शृंखला खंडित झाली होती. त्यामुळे संगमनेरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र तो फार काळ टिकला नाही. आजच्या गुरुवारी तालुक्याच्या रूग्ण संख्येत एकाच वेळी 38 रुग्णांची भर पडल्याने बाधितांचा आकडा तेरावे शतक ओलांडून 1 हजार 310 वर जाऊन पोहोचला आहे.