महायुतीचे अमोल खताळ पहिल्या फेरीत आघाडीवर! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का; पोस्टलसह ईव्हीएम मशीनची पहिली फेरी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यातील सर्वाधिक ‘हॉट’ ठरलेल्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर माजीमंत्री व काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. पोस्टल, निवडणूक कर्मचारी आणि गृह मतदानातील पहिल्या फेरीत थोरात तब्बल 1 हजार 831 मतांनी पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. सदरचा कल हा अत्यंत प्राथमिक असून यानंतर 20 फेऱ्यांमध्ये मतांची मोजणी केली जाणार आहे. मात्र सुरुवातीच्या फेरीतच अमोल खताळ यांनी आघाडी घेतल्याने महायुतीच्या अपेक्षा दुणावल्या आहेत. पहिले फेरीत अमोल कदम यांना 6 हजार 17 तर, नवरात्र 4 हजार 186 मते मिळाली.
Visits: 94 Today: 1 Total: 311039