‘महेश’मध्ये एलआयसी पॉलिसी तारण योजनेचा शुभारंभ
‘महेश’मध्ये एलआयसी पॉलिसी तारण योजनेचा शुभारंभ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील अग्रगण्य असणार्या महेश नागरी सहकारी पतसंसंस्थेने खास नवरात्र व दीपावली सणाच्या शुभ मुहूर्तावर एलआयसी पॉलिसी तारण कर्ज योजनेचा शुभारंभ केला आहे.

या योजनेंतर्गत कमी व्याजदर, कमी कागदपत्रे, विना जामीनदार व अल्पवेळेत संस्थेने कर्ज योजना उपलब्ध करून दिली आहे. सदर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी प्राथमिक कर्जदार एलआयसी विमा प्रतिनिधी दिलीप कोकणे, कैलास कलंत्री, ओमप्रकाश आसावा, अशोक सातपुते, मनोज पोफळे, प्रकाश शेराल, अण्णा दिवेकर, संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत मणियार, उपाध्यक्ष विशाल नावंदर, सीए. कैलास सोमाणी, डॉ.शशीकांत पोफळे, डॉ.राजेंद्र मालपाणी, योगेश जाजू, मोरेश्वर कोथमिरे, सरला आसावा, संस्थेचे व्यवस्थापक दिगंबर आडकी व कर्मचारी उपस्थित होते. या कर्ज योजनेचे व्यापार्यांकडून स्वागत होत आहे.

