बलात्कार प्रकरणाला वेगळे ‘वळण’ लागण्याची शक्यता! संगमनेरच्या उपनगरातील प्रकरण; आरोपीच्या जवाबातील ‘मावशी’ संशयास्पद..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी शहरालगतच्या उपनगरातील एका 45 वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर मूळच्या उत्तर प्रदेशातील तरुणाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या घटनेतील नराधमाला पीडित तरुणीच्या भावासह परिसरातील काही तरुणांनी रंगेहाथ पकडून चोप दिला व नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे होत असल्याची कुजबूज पोलीस वर्तुळात सुरु आहे. आरोपी प्रकाश रामनरेश निषाद याने नागरीकांनी पकडल्यानंतर ‘मै मावसी को छ सौ रुपये देकर आया था।..’ असे सांगितले होते. पोलिसांनी तोच धागा पकडून तपास पुढे नेला असता मनोरुग्ण तरुणीच्या असाहय्यतेचा गैरफायदा घेत परिसरातील ‘ती’ मावशीच तर तिच्याकडून हा गैरप्रकार घडवून घेत नसावी? असा दाट संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली फडोळ करीत आहेत, त्यांनी या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा निर्धार करुन तपास सुरु केल्याने या प्रकरणातून अतिशय धक्कादायक प्रकार समोर येण्याची दाट शक्यता आहे.

परवा बुधवारी (ता.11) शहराच्या अगदी लगतच गजबजलेल्या एका उपनगरातून हा संतापजनक प्रकार समोर आला होता. सामान्य कुटुंबातील दोघं भावंडे, मोठी बहिण आणि छोटा भाऊ. 1999 साली बहिणीचे लग्न झाले, त्यांना मुलगाही झाला. मात्र त्यानंतर तिला मानसिक आजार जडल्याने नवरा-बायकोतील कुरबूरी वाढून दोन वर्षातच त्यांच्यात काडीमोड झाला. तेव्हापासून ती माहेरी आपल्या आई-वडिलांकडेच राहू लागली. शहरातील एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असून नियमित वेळेला गोळ्यांचे सेवन केल्यास ती सामन्य राहते. गोळ्यांच्या वेळेत बदल झाल्यानंतर तिला आजाराचा धक्का बसून ती काहीही करायला सुरुवात करते. आसपासच्या कोणाच्या घरात थेट शिरते, मोठ्याने गाणं म्हणते, कोणाचीही नावे घेते.


दीड वर्षांपूर्वी या तरुणीच्या वडिलांचे निधन झाले. मुलांच्या भविष्यासाठी भावाने या उपनगरातील अन्य ठिकाणी वेगळे घर केले. नवरा-बायको दोघेही रोजंदारीवर जात असल्याने दुपारी बारानंतर पीडित मुलीची आई आपल्या मुलीला घरातच सोडून, आसपासच्या म्हातार्‍या-कोतार्‍यांना लक्ष ठेवण्यास सांगून मुलाच्या घरी जावून त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करायची. संध्याकाळी सहा वाजता मुलगा घरी आला की ती म्हातारी आपल्या घरी मुलीकडे परतायची. बुधवारी पीडितेची आई मुलाकडून घरी आली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडितेच्या भावाने आसपासच्या तरुणांच्या मदतीने आरोपी प्रकाश रामनरेश निषाद या नराधमाला पीडितेच्या घराचा आंतून बंद असलेला दरवाजा उघडायला लावला.


यावेळी तो कशासाठी आला आहे अशी विचारणा करीत आसपासच्या नागरीकांनी त्याला चोपही दिला. यावेळी जमलेल्यांना माहिती देताना त्याने सुरुवातीला आपण प्लंबर असल्याचे व आपले नाव सातपुते असल्याचे सांगितले होते. मात्र त्याला चोपल्यानंतर ‘घरमालकीन आपली मावशी आहे, मी तिला सहाशे रुपये देतो, ती मला बोलावते, म्हणून मी येतो..’ असा धक्कादायक खुलासा त्याने केला. मात्र त्याला पकडलेल्या तरुणांना त्यामागचे गांभीर्य लक्षात आले नाही, मात्र पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने आरोपीच्या प्राथमिक चौकशीतल्या ‘मावशी’वर फोकस केल्याची माहिती आहे. ‘ती बोलावते, मी सहाशे रुपये देतो..’ या चौकशीतून समोर आलेल्या गोष्टी अतिशय संतापजनक आहेत.


पीडितेची आई दररोज दुपारी 12 ते 6 असे सलग सहातास मुलाच्या घरी जाते ही गोष्ट त्यांच्या घराजवळ राहणार्‍यांना सोडता अन्य कोणाला माहिती असण्याचे फारसे कारण नाही. बुधवारी पीडितेच्या आईने बघितल्यानंतर तिच्या भावाने रंगेहाथ आरोपीला पकडल्याने हा प्रकार समोर आला. आरोपी प्रकाश निषाद घटनेच्या दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरात शिरल्याचे तपासातून समोर येत आहे. संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पीडितेची आई आली तेव्हा आवाज देवूनही दरवाजा उघडला गेला नाही. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास पीडितेच्या भावाने अन्य तरुणांच्या मदतीने त्याला बाहेर येण्यास भाग पाडले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.


आरोपी प्रकाश रामनरेश निषाद मूळचा उत्तर प्रदेशातील असला तरीही सध्या त्याचे वास्तव्य पावबाकी रस्त्यावर आहे. अगदी विरुद्ध बाजूला राहणारा एखादा नराधम गजबजलेल्या वासहतीमधील पीडितेचे घर हुडकतो, तीन-तीन तास मनोरुग्ण तरुणीच्या असाहय्यतेचा गैरफायदा घेतो, राक्षसी वृत्तीने तिच्या शरीराला आरबाडतो, पीडितेच्या आईने दरवाजा वाजवूनही उघडीत नाही, पीडितेचा भाऊ आल्यानंतर, दम दिल्यानंतर दरवाजा उघडला जातो. सराईतपणे मी सातपुते, प्लंबर असल्याचे सांगतो, थोबाड झोडल्यावर ‘घरमालकीन मेरे मावसी’ असल्याचे सांगतो, ‘मै छ सौ देता हूं, वो बुलाती हैं..’ असंही तो बोलून गेला. या सगळ्याच गोष्टी अतिशय संशयास्पद आणि गंभीर असून त्याच्या प्रत्येक पैलूंवर प्रकाश टाकून या प्रकरणाचा उलगडा करण्याची गरज आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली फडोळ करीत आहेत, घटनेच्या मूळाशी जावून तपास करण्याची त्यांची वृत्ती असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणातून त्याचाही प्रत्यय येण्याची शक्यता आहे.


गजबजलेल्या उपनगरात घडलेल्या मानवतेला काळामा फासणार्‍या या घटनेने संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात रंगेहाथ पकडलेल्या आरोपी प्रकाश रामनरेश निषाद याने ‘घरमालकीन मेरी मावसी है, मै उसको छ सौ रुपये देता हूं, वो मुझे बुलाती है..’ असा जवाब दिला आहे. त्याच्या या तीन ओळीतच या घटनेचे गांभीर्य असून आरोपीने उल्लेख केलेल्या ‘घरमालकीन मावशी’चा या प्रकरणाशी असलेला संबंध आणि आरोपी सहाशे रुपये कशाचे देत होता याचा सखोल तपास यातून धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता असून गुन्ह्याची व्याप्तीही वाढणार आहे. पोलिसांनी मानवतेच्या दृष्टीतून या प्रकरणाच्या मूळाशी जावून त्याचा उलगडा करण्याची अपेक्षा आहे.

Visits: 55 Today: 2 Total: 98380

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *