लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार राहुरी पोलिसांत तरुणावर गुन्हा; तालुक्यात उडाली खळबळ


नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नुकतेच तिचे अपहरण करण्यात केले. त्यानंतर मुलीला तालुक्याबाहेर नेऊन आईवडीलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेतील १७ वर्षे ७ महिने वय असलेली पीडित तरुणी ही बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. ती शनिवारी (ता.२०) दुपारी ११ वाजेच्या सुमारास महाविद्यालयासमोर उभी होती. तेव्हा शुभम सत्रे हा तरुण तेथे आला आणि तरुणीला म्हणाला माझे तुझ्यावर प्रेम आहे. आपण पळून जाऊन लग्न करु असे सांगून आरोपी शुभमने त्या तरुणीला मोटारसायकलवर बसवून एका परिसरातील हॉटेलमध्ये नेले.

तेथे शुभमने पीडित तरुणीला तिच्या आईवडीलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर त्याने तरुणीला अहमदनगर येथे नेले. तेथून एका चारचाकी वाहनातून अहमदनगर ते बीड रस्त्यावर असलेल्या एका गावात नेऊन खोलीत ठेवले. रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आरोपी शुभमचे चुलत आजोबा आले. त्यांना पाहून शुभम पळून गेला. त्यानंतर शुभमच्या चुलत आजोबांनी पीडित तरुणीला राहुरी येथील घरी आणून सोडले. त्यानंतर तरुणीने तिच्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. सदर फिर्यादीवरून शुभम राजेंद्र सत्रे (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी तरुणाला अटक केली आहे.

Visits: 2 Today: 1 Total: 23160

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *