वाल्मिक चौधरींनी व्यवसायात मूल्यांची जपणूक केली ः कुदळे समर्थ फर्निचर अँड मॉलच्यावतीने भाग्यवान ग्राहकांना बक्षिसे


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वाल्मिक चौधरी यांनी आपल्या व्यवसायात मूल्यांची जपणूक केली आहे. त्यांनी सतत देण्याची वृत्ती जोपासली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक अविनाश कुदळे यांनी केले. ते समर्थ फर्निचर अँड मॉलच्यावतीने ग्राहकांसाठीच्या आयोजित मोफत भाग्यवान ग्राहक सोडत योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

समर्थ फर्निचर अँड मॉल यांच्यावतीने यावर्षीच्या मोफत फर्निचर बस्ता सोडत जाहीर करण्यात आलेली होती. याचे भाग्यवंत विजेते विलास भागोजी गावडे तर दीपावली व दसरा ऑफरचे मानकरी सादिक अली मणियार हे दोघे ठरले असल्याची माहिती मॉलचे प्रमुख वाल्मिक चौधरी यांनी दिली.

गेल्या सहा वर्षांपासून संगमनेर व अकोले या दोन ठिकाणी समर्थ फर्निचर अँड मॉल सुरू केलेले आहे. या मॉलमध्ये अनेक नामांकित कंपनीचे फर्निचर तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अल्पावधीतच हा मॉल ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला आहे. दरवर्षी फर्निचर बस्ता व दीपावली-दसरा या सणाच्या निमित्ताने फर्निचर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबववित असतात. याहीवर्षी दीपावली-दसरा तसेच फर्निचर बस्ता हा अभिनव उपक्रम समर्थ फर्निचर अँड मॉलच्यावतीने दोन्ही शाखेत राबविण्यात आला होता.

दरवर्षाप्रमाणे याही वर्षी राबविलेल्या फ्री फर्निचर बस्ता या उपक्रमामध्ये ३०० पेक्षा अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता. या योजनेच्या सोडतीमध्ये अकोले तालुक्यातील विलास गावडे या भाग्यवंत विजेत्याची चिठ्ठी निघाली, त्यामुळे त्यांना फर्निचर बस्ता खरेदी एवढ्या रक्कमेचा धनादेश तसेच दीपावली-दसरा निमित्ताने फ्री बेडरूम सेट देण्यात आला. या योजनेत ५०० पेक्षा अधिक ग्राहकांनी सहभाग घेतला होता. भाग्यवान ग्राहकांना मोठा बेडरूम सेट उद्योजक अविनाश कुदळे, पत्रकार संदीप वाकचौरे, गोरक्षनाथ मदने, ज्ञानराज उद्योग समूहाचे संचालक धनंजय आहेर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी समर्थ फर्निचर अँड मॉलचे संचालक वाल्मिक चौधरी, गणेश चौधरींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Visits: 119 Today: 2 Total: 1098907

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *