‘आधार’कडून दोनशे वंचित कुटुंबियांची दिवाळी गोड! दिवाळी फराळ, मिठाईसह साड्यांचे केले महिलांना वाटप


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सर्वत्र दिवाळीचा उत्साह, आनंदोत्सव सुरू असतो. घराघरात-दारादारात, अंगणात दिवाळीचे दिवे मिणमिणत असतात. पण आपल्या आसपास काही कोपरे असे असतात, जिथे अंधार असतो. असे काही कुटुंब मात्र या उत्सवापासून वंचित असतात. अशा वंचितांच्या, भटकंती व मोलमजुरी करणार्‍या व्यक्तींच्या झोपडीवर जाऊन संगमनेर येथील आधार फाउंडेशन परिवाराने दिवाळीच्या दिवशी सकाळी दिवाळी साजरी केली.

लमाण तांडा (लोहारे मिरपूर), गोलवड वस्ती (कुरण), बर्डे वस्ती (सोनुशी), बिरेवाडी, माळी वस्ती (निळवंडे), हिवरगाव पावसा टोलनाका आदी ठिकाणच्या २०० कुटुंबियांना दिवाळी फराळ, मिठाई व साड्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आधारचे शिलेदार प्राचार्य पी. आर. शिंदे, प्रा. किसन दिघे, भानुदास आभाळेे, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, सुशिला हासे, शिवव्याख्याते दीपक कर्पे, योगतज्ज्ञ सुभाष पाराशर, प्रा. धोंडीभाऊ गुंजाळ, अरविंद गाडेकर, माजी सैनिक लक्ष्मण ढोले, निवृत्ती शिर्के, देवीदास गोरे, रामदास सोनवणे, सुभाष ताजणे, संजय अभंग, भारत ताजणे सचिन कानवडे, सखाराम तळपाडे आदिंसह प्रत्येक वस्तीवरील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्प प्रमुख तान्हाजी आंधळे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. या २०० वंचितांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दीड किलो दिवाळी फराळ लाडू, करंजी, शेवचिवडा, चकली, बाकरवडी, प्रत्येक माता-भगिनींना नवी कोरी साडी व बालगोपाल मंडळीस खाऊ मिळाल्याने कुटुंबियांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. आधारच्या सर्व क्षेत्रातील देणगीदारांच्या दातृत्वातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. वाकचौरे, राजू रहाणे, आर. जी. पावसे, दस्तगीर शेख, सुरेश साळुंके, रमेश डोंगरे, कैलास वराडे, आदित्य कोते, संतोष शेळके, मनोहर यादव, मच्छिन्द्र पावसे, शारदा अरगडे, मंदा कडलग, नामदेव इल्हे, अविनाश वाकचौरे, विजय फापाळे, सुभाष वारुंक्षे यांसह सर्व आधार समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 150 Today: 1 Total: 1412261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *