संगमनेरकरांनी लुटली फुलझडीत खरेदीची मजा! रोटरी क्लब, इनरव्हील क्लबच्या प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने २८ ते ३० ऑक्टोबरपर्यंत मालपाणी लॉन्स येथे पार पडलेल्या अनोख्या फुलझडी प्रकल्पाला संगमनेरकरांनी पसंतीची मोहर उमटवली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या या प्रकल्पात महिला, पुरुष व लहान मुलांचा विचार करुन विविध प्रकारचे स्टॉल संपूर्ण महाराष्ट्रातून आले होते.

रोटरी क्लब संगमनेर व इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर या दोन्ही संस्था समाजसेवेसाठी ओळखल्या जातात. संगमनेर शहर व ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या उद्योजकांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने एक व्यासपीठ मिळावे तसेच नागरिकांनी एकाच ठिकाणी खरेदीचा आनंद घेता यावा या उद्देशाने हा दिवाळी मेळा आयोजित केल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष आनंद हासे व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनीता गाडे यांनी दिली.

या मेळ्याचे उद्घाटन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रीक्ट ३१३ च्या डीसी रचना मालपाणी, आमदार सत्यजीत तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उद्योजक सीए. कैलास सोमाणी यांच्या हस्ते झाले. या मेळ्यात ११० स्टॉलधारकांनी आपली दुकाने थाटली होती. यामध्ये लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व पुरुषांचे कपडे, ब्युटी प्रॉडक्ट, लहान मुलांचे आकर्षक कपडे, हातमागावर तयार केलेले कपडे, पॅकिंग फूड, रोजच्या गरजेच्या वस्तू, फर्निचर मॉल, लज्जतदार खाद्यपदार्थ, दिवाळी सणाचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू, दिवाळी लाईट, दिवे, आर्ट, क्राफ्ट, आरोग्याशी संबंधित स्टॉल, मुलांसाठी खेळण्याच्या वस्तू यांसारखे अनेक स्टॉल सहभागी झाले होते. या मेळ्यासाठी मिताली ब्रायडल वर्ल्ड व एक्स्पर्ट डेंटल क्लिनिक हे सहप्रायोजक होते.

शेवटच्या दिवशी सर्व स्टॉलधारकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच यामध्ये स्टॉलधारकांतून उत्कृष्ट स्टॉलचे प्रथम तीन पारितोषिके देण्यात आली. फुलझडी या शॉपिंग महोत्सवाचे यंदाचे हे पहिलेच वर्ष असून इथून पुढे प्रतिवर्षी हा खरेदी महोत्सव आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी बोलून दाखवला. या प्रकल्पाच्या यशस्वीततेसाठी प्रकल्प प्रमुख महेश वाकचौरे, महेश ढोले, डॉ. एकता वाबळे, प्रतिमा गाडे, रोटरी क्लबचे सेक्रेटरी मधुसुदन करवा, खजिनदार अमित पवार, इनरव्हील क्लबच्या सचिव शिल्पा नावंदर, सचिव नेहा सराफ, प्रकल्प समितीतील दीपक मणियार, अजित काकडे, नरेंद्र चांडक, डॉ. किशोर पोखरकर, सीए. संजय राठी, ओंकार सोमाणी, योगेश गाडे, रवींद्र पवार, मयूर मेहता, ऋषीकेश मोंढे, संदीप फटांगरे, संजय कर्पे, सुनील घुले, मोहित मंडिलक, रमेश पावसे, विकास लावरे, संतोष आहेर, विश्वनाथ मालाणी, सौरभ म्हाळस, ज्योती कासट, प्रीती फटांगरे, पिंकी शाह, राखी करवा, सीमा अत्रे, डॉ. श्यामा पाटील, सुनीता गांधी, श्वेता जाजू तसेच सर्व रोटरी क्लब सदस्य, इनरव्हील क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.

Visits: 150 Today: 4 Total: 1103022

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *