एरोबिस चॅम्पियनशीप स्पर्धेत ‘ध्रुव’चे वर्चस्व! गोंदियात पार पडली स्पर्धा; चौदा सुवर्णसह बावीस पदकांची कमाई


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोंदियातील तिरोरा क्रीडा संकुलात पार पडलेल्या अठराव्या एसएएफएम महाराष्ट्र राज्य एरोबिस चॅम्पियशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे वर्चस्व दिसून आले. मुला-मुलींच्या स्वतंत्र गटात झालेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंनी चौदा सुवर्णपदकांसह एकूण २२ पदकांची कमाई करताना राज्यस्तरीय चषकही पटकावला.

चौदा वर्षांखालील फिटनेस संघाने एकामागून एक तब्बल आठ सुवर्णपदकांची कमाई करीत सुरुवातीलाच या स्पर्धेवर प्रभुत्त्व मिळवले. आर्या तक्ते, मानसी आहेर, नंदिनी हुलवान, तनुश्री लहामगे, आस्था जोशी, मनस्वी कदम, आदिती काळे व अस्मी वर्पे यांचा या सुवर्ण कामगिरीत सहभाग होता. अकरा वर्षांखालील दुहेरी स्पोटर्स एरोबिसमध्येही ईशान उगले आणि आलोक आरोटे यांनी सुवर्णपदके पटकाविताना आपल्या शाळेचा झेंडा अधिक उंचावर नेला.

चौदा वर्षांखालील मुलांच्या दुहेरी गटातही याच प्रकारातील उत्कृष्ट प्रदर्शन सादर करताना ध्रुव ग्लोबलच्या रचित कासट आणि शौर्य मणियार यांच्या जोडीने सुवर्ण कामगिरी बजावताना शाळेचा सुवर्ण तक्ता पुढे नेला. वैयक्तिक प्रकारातील सादरीकरणातही रचित कासट आणि शौर्य मणियार या दोघांनी सुवर्णपदक मिळवले. ईशान उगले, रुद्र हुलवान, राजवीर आवारी, युग भंडारी आणि पृथ्विक कोल्हे यांनी रौप्य तर, आलोक आरोटे, ओम गणोरे आणि साईराज बालोडे या तिघांनी कांस्यपदके मिळवताना संघाच्या एकूण कामगिरीचा आलेख उंचावत नेला. ध्रुव ग्लोबल स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक कुलदीप कागडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 79633

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *