अकोलेच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे बिनविरोध भाजप कार्यालयात नगरसेवकांनी केला नगराध्यक्षांचा सत्कार
नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी बाळासाहेब वडजे यांची बुधवारी (ता.२६) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नगराध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी बाळासाहेब वडजे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नगरसेविका शीतल वैद्य तर अनुमोदक म्हणून नगरसेवक शरद नवले यांनी स्वाक्षरी केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत बाळासाहेब वडजे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
नूतन नगराध्यक्ष वडजे हे माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या निवडीची घोषणा होताच समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. यावेळी नगरसेवक शरद नवले, विजय पवार, सागर चौधरी, नवनाथ शेटे, आरिफ शेख, प्रदीप नाईकवाडी, वैष्णवी धुमाळ, कविता शेळके, तमन्ना शेख, माधुरी शेणकर, जनाबाई मोहिते, श्वेताली रुपवते, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर अकोले भाजप कार्यालयात नगरसेवकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सचिव सुधाकर देशमुख, माजी सचिव यशवंत आभाळे, अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंद वाकचौरे, अप्पासाहेब आवारी, गंगाधर नाईकवाडी, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, सी. बी. भांगरे, राजेंद्र देशमुख, किसन लहामगे, रामनिवास राठी, बाळासाहेब सावंत, मच्छिंद्र मंडलिक, सचिन जोशी, अशोक आवारी, अमोल वैद्य, बबलू धुमाळ, सचिन शेटे, परशराम शेळके, मोहसिन शेख, रवींद्र शेणकर, नवनाथ मोहिते, नानासाहेब नाईकवाडी, सुनील देशमुख, निलेश देशमुख, डॉ. विराज शिंदे, संजय जाधव, अनिल गायकवाड, संपत गायकवाड आदी उपस्थित होते.