‘राजहंस’कडून दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणार्या राजहंस दूध संघाच्यावतीने कोरोना संकटात रुग्णांच्या मदतीकरिता नुकतेच 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले आहेत.
सदर मशीनचे वितरण करतेवेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, संचालक लक्ष्मण कुटे, मोहन करंजकर, आर.बी.रहाणे, भास्कर सिनारे, विलास वर्पे, गंगाधर चव्हाण, बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहिंज, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, सुभाष आहेर, प्रतिभा जोंधळे, ताराबाई धूळगंड, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, डॉ.राजकुमार जर्हाड, डॉ.संदीप कचेरिया, डॉ.सुरेश घोलप, डॉ.प्रदीप कुटे, फायनान्स मॅनेजर शिंदे आदी उपस्थित होते.