‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे मंगळवारी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचे मंगळवारी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
नायक वृत्तसेवा, राहाता


लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी सर्वच पक्षांचे मान्यवर नेते व्हर्च्युअल रॅलीद्वारे सहभागी होणार आहेत.


प्रकाशन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम सामाजिक अंतराचा नियम पाळून प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच पक्षांचे विद्यमान आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विखे पाटील परिवाराची विनंती मान्य करुन या व्हर्च्युअल रॅलीत सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. दरम्यान, जिल्ह्यात 14 तालुक्यांमध्ये या व्हर्च्युअल रॅलीत सर्वांना सहभागी होता यावे यासाठी प्रवरा परिवाराच्यावतीने कोरोना नियमावलीचे पालन करुन नियोजन करण्यात आले आहे. तसेच समाज माध्यमांवरही हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे यासाठी प्रवरा परिवारातील विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्तिगत भेटी घेवून निमंत्रण दिले आहे.

Visits: 12 Today: 2 Total: 66289

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *