राज्य सरकारच्या आदेशाचा निषेध करून संगमनेर भाजपचे आंदोलन

राज्य सरकारच्या आदेशाचा निषेध करून संगमनेर भाजपचे आंदोलन
दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप; प्रांताधिकार्‍यांसह तहसीलदारांना दिले निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कृषी कायद्याच्या अध्यादेशांची अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाविकास आघाडी सरकार आता या कायद्यांना विरोध करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने संसदेत शेतकर्‍यांच्या जीवनात नवी पहाट आणणारे विधेयक पास केले आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने ते लागू करण्यास नकार देत स्थगिती दिली आहे. याबाबत भाजप किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, संगमनेर भाजप तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली या स्थगिती आदेशाचा तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निषेध करण्यात आला.


तीन कृषी विधेयकांबाबत केंद्र सरकारने कायदा मंजूर करण्यापूर्वी जारी केलेल्या अध्यादेशांची महाराष्ट्रात सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश ऑगस्टमध्येच निघाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या पणन संचालकांनी 10 ऑगस्ट रोजी या तीन अध्यादेशांची सक्तीने अंमलबजावणी करण्याची अधिसूचना काढली होती. मात्र आधी अध्यादेश लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या महाविकास आघाडी सरकारने संसदेत या शेतकरी विधेयकांना ठाम विरोध केला होता. संसदेने याबाबत मंजूर केलेले कायदे राज्यात लागू न करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनीही शुक्रवारी केली आहे. त्यामुळे आधी याच कायद्याच्या अध्यादेशांची अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाविकास आघाडी सरकार आता या कायद्यांना विरोध करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्ष नवीन कृषी कायद्याबद्दल शेतकरी व समाजात खोटा प्रचार करून भ्रम निर्माण करत कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलाल, मापाडी यांच्या पिळवणुकीतून शेतकर्‍यांची सुटका करणारा व शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाविषयी स्वातंत्र्य देणारा नवीन कृषी कायदा केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर महाराष्ट्रातील आघाडी सरकारने तो कायदा राज्यात लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास शेतकरी, शेतकरी संघटना, भारतीय जनता पक्ष व समविचारी संघटना एकत्र येत कृषी विधेयकास समर्थन देऊन राज्य सरकारच्या आदेशाचा निषेध नोंदवत आहे.


याबाबत प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांना निवेदन देतेवेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक शिरीष मुळे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, विठ्ठल शिंदे, माजी शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, वैभव लांडगे, सचिन शिंदे, अशोक शिंदे, संजय नाकिल, किशोर गुप्ता, सुनील खरे, केशव दवंगे, शैलेश फटांगरे, संतोष पठाडे, नवनाथ वावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 107 Today: 1 Total: 1115756

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *