कोल्हार येथील चहा विक्रेत्याची आत्महत्या

कोल्हार येथील चहा विक्रेत्याची आत्महत्या
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोल्हार येथील चहा विक्रेते भाऊसाहेब नाथाजी तांदळे (वय 75) यांनी शुक्रवारी (ता.9) सकाळी आपल्या दुकानातील लोखंडी खांबास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकामागोमाग ही तिसरी आत्महत्या असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


बेलापूर रस्त्यालगत वास्तव्यास असलेले आणि अनेक वर्षांपासून चहाचे दुकान चालवणारे तांदळे सकाळी घरी चहा घेऊन दुकानात आले. त्यानंतर दुकानातील लोखंडी गजास लटकून त्यांनी आत्महत्या केली. कोरोनामुळे दर शुक्रवारी संपूर्ण गावात जनता संचारबंदी असते. त्यामुळे ही घटना घडूनही सर्व दुकाने बंद असल्याने कुणाच्या लक्षात आली नाही. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र औटी यांनी घटनास्थळी येऊन तांदळे यांचा मृतदेह लोणी येथील प्रवरा रुग्णालयात हलविला. दरम्यान, गेल्या महिन्यात एका शिक्षकाने सातव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. आठ दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाने विहिरीत उडी घेऊन जीवन संपविले. त्यापाठोपाठ आता चहा व्यावसायिकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. यावरुन कोल्हारमध्ये आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याने खळबळ उडाली आहे.

Visits: 226 Today: 1 Total: 2165419

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *