जिल्ह्यात चौदा बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जिल्हा उपनिबंधकांनी केली निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती


नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्ह्यातील 14 बाजार समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. येथे निर्णय घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी केली असून त्यांच्याकडेच निवडणुकीच्या संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याचे सांगितले आहे.

जिल्ह्यात दोन टप्प्यात बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. कोविडच्या दोन लाटा आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यामुळे सर्व तालुक्यात राजकीय पक्षांनी आता आपले लक्ष बाजार समिती व खरेदी-विक्री संघांच्या निवडणुकीवर केंद्रीत केलेले आहे. सहकारातील संस्था असल्यामुळे या निवडणुकांत ऐन उन्हाळ्यात गरमागरमी पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, या निवडणुकांसाठी 14 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची निवड करण्यात आली असून यात नगरच्या बाजार समितीसाठी देवीदास घोडचोर, संगमनेर बाजार समितीसाठी सर्जेराव कांदळकर, राहुरी बाजार समितीसाठी संदीप रूद्राक्ष, पारनेर बाजार समितीसाठी गणेश औटी, श्रीगोंदा बाजार समितीसाठी अभिमान थोरात, पाथर्डी बाजार समितीसाठी एस. एन. खर्डे, कर्जत बाजार समितीसाठी सुखदेव सूर्यवंशी, जामखेड बाजार समितीसाठी राजेंद्र निकम, श्रीरामपूर बाजार समितीसाठी दीपक नागरगोजे, राहाता बाजार समितीसाठी रावसाहेब खेडकर, नेवासा बाजार समितीसाठी गोकुळ नांगरे, शेवगाव बाजार समितीसाठी विजय एकवाल, अकोले बाजार समितीसाठी एस. डी. कुलकर्णी आणि कोपरगाव बाजार समितीसाठी नामदेव ठोंबळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *