उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ मॅरेथॉन स्पर्धा! लायन्स सफायरचा उपक्रम; विजेत्या स्पर्धकांना भरघोस रोख पारितोषिके


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवंगत उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येत्या रविवारी लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्यावतीने संगमनेरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होवून विजेत्या ठरणार्‍या स्पर्धकांना मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सफायरचे अध्यक्ष उमेश कासट यांनी केले आहे.

येत्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता मालपाणी लॉन्स येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे मुला-मुलींचे वेगळे गट करण्यात आले आहेत. त्यापुढील वयाच्या स्पर्धकांसाठी खुला गट ठेवण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या सर्वांसाठी 6 किमी अंतराची ही स्पर्धा असेल. प्रत्येक गटातील पहिल्या चार विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रत्येक गटात चार उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. सर्व गटात मिळून एकूण चाळीस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र व स्वदेश प्रॉपर्टीच्यावतीनेे आकर्षक टोपी (कॅप) दिली जाणार आहे. शालेय स्पर्धकांनी स्पर्धेसाठी येताना शाळेने दिलेला वयाचा पुरावा सोबत आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांना व्यायामाची आवड होती. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ हा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षी हे दहावे वर्ष असल्याची माहितीही प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी गिरीश मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष उमेश कासट, सचिव कल्याण कासट, खजिनदार गौरव राठी, प्रकल्प प्रमुख सुनीता मालपाणी, पूजा कासट, श्रद्धा मणियार, अनिरुद्ध डिग्रसकर, अतुल अभंग, चैतन्य काळे, कृष्णा आसावा, प्रणित मणियार, श्रीनिवास भंडारी, राजेश रा. मालपाणी, महेश डंग, डॉ. अमोल पाठक, अमर लाहोटी, नामदेव मुळे, विजय ताजणे, रोहित मणियार, विलास बेलापूरकर, सुमित मणियार, अतुल देशमुख, धनंजय धुमाळ, जितेंद्र पाटील, विशाल नावंदर, सिद्धांत कासट, सुभाष मणियार, जितेश लोढा, योगेश जोशी, ओम इंदाणी, अमोल वालझाडे, संकेत कलंत्री, देविदास गोरे, मीना मणियार, राजश्री भंडारी, डॉ. मधुरा पाठक, नम्रता अभंग, प्रियंका कासट, अनुजा सराफ, आदित्य राठी, मंजूषा भोत यांच्यासह सफायरचे सर्व सदस्य नियोजन करीत आहेत.

Visits: 15 Today: 1 Total: 115317

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *