संगमनेर इनरव्हीलतर्फे राष्ट्रबांधणीचे शिल्पकार शिक्षक पुरस्कार जाहीर रविवारी मालपाणी लॉन्स येथे आमदार थोरातांच्या हस्ते होणार वितरण


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण समाजासाठी देणे लागतो या भावनेतून इनरव्हील क्लब वेगवेगळ्या प्रकल्पांद्वारे समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत असते, याच प्रयत्नांचा भाग म्हणून राष्ट्रबांधणीच्या कामात मोलाची साथ देणार्‍या प्रयोगशील शिक्षकांचा सन्मान केला जावा, त्यांना त्यांचे काम अधिक चांगल्याप्रकारे करता यावे यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून राष्ट्रबांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 42 शिक्षकांची व आदिवासी सांदण चळवळ आणि 5 शाळांची या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

रविवारी (ता.12) या पुरस्कारांचे वितरण मालपाणी लॉन्स येथे दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वृषाली कडलग, प्रकल्प प्रमुख सुनीता कोडे व शुभलक्ष्मी बेलापूरकर यांनी दिली आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक बी. जी. शेखर, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इनरव्हील जिल्हा 313 च्या डिस्ट्रिक्ट उपाध्यक्षा रचना मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये राहुल गोडे गांजविहीर अकोले, सुनीता वल्टे कारवाडी अकोले, रावसाहेब वाळकोळी महादेववाडी अकोले, विजय जाधव मोहा जामखेड, अशोक घालमे बोरीशेळवण कर्जत, दत्तात्रय गरुड हारदेवस्ती कोपरगाव, सुजाता पुरी वडगाव गुप्ता अहमदनगर, शरद धलपे काळामळा अहमदनगर, ऋषीकेश गोरे तुकाई माळा वाळकी नगर, शांता मरकड चांदा नेवासा, दिलीप बोरुडे मोहरी पाथर्डी, शहादेव काळे अकोला पाथर्डी, सीमा देशपांडे कोल्हार राहाता, राहुल पुरी बनसोडे वर्ग साकुरी राहाता, अर्चना मुळे कोळसे वस्ती गुहा राहुरी, अर्चना माळी गंगापूर राहुरी, दीपाली रेपाळ गोदेवाडी सारोळे पठार संगमनेर, शुभांगी ईश्वरे खेडकरवाडी श्रीगोंदा, मीना निकम गोंडेगाव श्रीरामपूर, अनिल ओहळ गोखलेवाडी श्रीरामपूर, छाया थोरात जामगाव पारनेर, दत्तात्रय चौरे बनाई वस्ती टाकळी ढोकेश्वर पारनेर, उपप्राचार्य दीपक जोंधळे मॉडर्न हायस्कूल अकोले, सविता चौधरी चासनळी कोपरगाव, अनुराधा केदार करंजी पाथर्डी, अविनाश पवार बांधखडक जामखेड, संजयकुमार कुलकर्णी खर्डे पाटोळे वर्ग भगवतीपूर राहाता, सुप्रिया इंगळे गंगानगर नेवासा, अमोल जाधव चिखली संगमनेर, अनिल वाकचौरे दत्त विद्यालय जवळे कडलग संगमनेर, आबा सूर्यवंशी पवारवाडी टाकळी खंडेश्वरी कर्जत, दया चौधरी चांदे खा. कर्जत, कैलास गिते नगरपालिका शाळा क्र.01 संगमनेर, आदिकराव बचाटे कोंभळी कर्जत, प्रवीण गाडेकर देशमुख खतोडे आखाडा राजापूर, पुष्पा सूर्यवंशी कोल्हारवाडी पांजरे अकोले, संगीता गवळी अकोले यांचा समावेश आहे.

याचबरोबर अकोले येथील आदिवासींच्या सांदण चळवळ, सह्याद्री विद्यालय संगमनेर, न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दिघे संगमनेर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव माथा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगावतळ आणि चळवळीस इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.

Visits: 143 Today: 1 Total: 1419474

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *