… तर आम्ही नेतृत्वाबरोबर राहणार नाही! माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊतांचा इशारा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गद्दारांना नेतृत्वानं जवळ केलं तर आम्ही आता नेतृत्वाबरोबर राहणार नाही. कारण त्यांच्यामुळेच घुलेवाडी ग्रामपंचायतमधील शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. ज्यांना नेतृत्वानं सगळं दिलं. तेच पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा घेऊन निवडणुकीत उतरले, अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी माध्यमांकडे व्यक्त केली.

सरपंचपद अपक्ष उमेदवाराने घेतले असले तरी उर्वरीत पंधरा सदस्य शेतकरी विकास मंडळाचे आहेत. त्यामुळे आम्हांला विश्वासात घेतल्याशिवाय सरपंचांना विकासकामे करता येणार नाही. शेतकरी परिवर्तन मंडळाने आमदार बाळासाहेब थोरातांचे फोटो निवडणुकीत वापरले असले तरी त्यांना काही फायदा झाला नाही. कारण जनतेला काँग्रेस पक्षात कोण काय करतयं हे चांगल माहीत असल्याचं सीताराम राऊत म्हणाले.

तत्कालिन सरपंचांना पद देताना आम्ही पक्षाचा आदेश पाळला. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकीत नेतृत्वाने सांगूनही त्यांन विरोधात काम केलं, हे चुकीचं आहे. नेतृत्वाने आता अशा लोकांना दूर करुन धडा शिकविला पाहिजे असा पुनरुच्चार राऊत यांनी केला. माजी सरपंचावर अविश्वास ठराव आणल्यामुळे जनता नाराज होती का? असा प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, अविश्वास ठरावानंतर आमही आठ महिन्यातच 81 कोटी 67 लाखांची पाणी योजना मंजूर करुन घेतली. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत असेल तर विकासकामांची गती ही अधिक पटीने वाढते. घुलेवाडी गावाला दुर्वे नाना, खताळ पाटील, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा आहे. आम्ही करु तेच हे घुलेवाडी गाव कधीही सहन करत नाही. अपक्ष सरपंच निवडून आले त्यांनी आमदार थोरातांचे नेतृत्व मान्य करुन घुलेवाडी गावच्या विकासाला गती द्यावी. आजची घुलेवाडी 2027 मध्ये एक मॉडेल व्हिलेज म्हणून नावारुपाला आणण्यासाठी आम्ही विकास आराखडा तयार केला आहे. अमृत उद्योग समूहाची यंत्रणा तुमच्या पाठिशी होती. या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना सांगितले, काही कर्मचार्‍यांनी आमच्या विरोधात निवडणूक लढविली. मग कुठं आमच्याबरोबर यंत्रणा होती.

भाजप सध्या संगमनेर तालुक्यात खुनशीचं राजकारण करत आहे. स्टोन क्रशर बंद असल्याने सेट्रींग कॉन्ट्रॅक्टरवर वडापाव विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सुडबुद्धीने जे राजकारण सुरू आहे ते थांबवा असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना लगावला.

Visits: 17 Today: 1 Total: 118175

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *