धामोरीमध्ये महामानवांची विटंबना; समता सैनिक दलाकडून निषेध

धामोरीमध्ये महामानवांची विटंबना; समता सैनिक दलाकडून निषेध
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेले धामोरी गावातील काही खोडशाळ मनुवादी वृत्तीच्या समाजकंटकाने सार्वजनिक स्वछतागृहामध्ये विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आक्षेपार्ह लिखाण करून विटंबना केलेच्या निषेधार्थ रविवारी (ता.4) समता सैनिक दलाच्या अहमदनगर संघटनेच्यावतीने धामोरीतील बौद्ध वस्तीला भेट दिली. तसेच निषेध सभा घेऊन शांतता व समता प्रस्थापित करण्याचे आवाहन करुन कोपरगाव ग्रामीण पोलिसांना आणि सरपंच यांना निवेदन देण्यात आले.


शनिवारी (ता.3) धामोरी गावातील काही जातीयवादी, मनुवादी वृत्तीच्या समाजकंटकाने मध्य ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वछतागृहात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे आक्षेपार्ह लिखाण केले. संबंधित बाब गावातील काहींच्या लक्षात आल्यावर त्यांनी या घटनेबाबत कोपरगाव पोलिसांना तक्रार दिली. त्यानंतर गावातील प्रमुखांची बैठक घेऊन गाव दोन दिवस बंद ठेवण्यात आले. परंतु अद्यापही आरोपीला अटक झालेली नसल्याने रविवारी समता सैनिक दलाच्यावतीने धामोरी गावाला भेट देऊन पोलीस निरीक्षक अनिल कटके व सरपंच भाकरे यांना विटंबना करणार्‍या आरोपीला कडक शासन करुन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे नगर जिल्हाप्रमुख के. पी. रोकडे, तालुकाप्रमुख शांताराम रणशूर, राजेंद्र मेहेरखांब, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, शाहीर सोनवणे, विजय गायकवाड, संदीप मेहेरखांब, गौतम गोडगे, सुशांत पवार, अरुण लोंढे, विशाल लोंढे, सिद्धार्थ राजेंद्र मेहेरखांब आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Visits: 122 Today: 1 Total: 1104276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *