देडगाव येथील विवाहितेचा सासरकडून छळ
देडगाव येथील विवाहितेचा सासरकडून छळ
नायक वृत्तसेवा, नेवासा
महिलांवरील अत्याचार, हुंड्यासाठी किंवा इतर कारणासाठी महिलांवर होणारे छळ या गोष्टी अजूनही समाजात घडत आहेत. अशाच एका नेवासा तालुक्यातील देडगाव येथील घटनेने सर्वांना हादरून सोडले आहे. ट्रॅक्टर घेण्याकरिता आईवडिलांकडून 4 लाख रुपये घेऊन यावे, यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सासू सासर्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शीतल आवजीबाबा लोखंडे (वय 27, हल्ली रा.पाचुंदा, ता.नेवासा) असे या विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या फिर्यादी म्हंटले आहे की, सासरी पती आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे, सासरे गंगाधर यशवंत लोखंडे, सासू लक्ष्मीबाई गंगाधर लोखंडे, भाया अंबादास गंगाधर लोखंडे, जाव मीना अंबादास लोखंडे हे होते. तीन वर्षांनंतर ते कुटुंबात मला त्रास देऊ लागले. शिवीगाळ करु लागले आणि म्हणाले ‘शेतीच्या कामासाठी तुझ्या माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये’ असे म्हणून माझा शारीरिक आणि मानसिक छळ करु लागले. तसेच मारहाण करत उपाशीपोटीही ठेऊ लागले. त्यानंतर शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टर घ्यायचा आहे. त्याकरिता तुझ्या आईवडीलांकडून 4 लाख रुपये घेवून ये. असे म्हणून मला पुन्हा दमदाटी करुन माझा पुन्हा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. यावरुन पोलिसांनी सासू सासर्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

