कुख्यात गुंड सुभाष माळीच्या आवळल्या मुसक्या बारागाव नांदूरमध्ये राहुरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


नायक वृत्तसेवा, राहुरी
गेल्या सात वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड, वाळूतस्कर सुभाष साहेबराव माळी यास बारागाव नांदूर (ता. राहुरी) येथून राहुरी पोलिसांनी सापळा लावून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे.

राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत सुभाष साहेबराव माळी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी बारागांव नांदूर येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली असता पोलिसांनी साध्या वेशात तीन दिवसांपासून सापळा लावला असता मंगळवारी (ता.8) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास झडप घालून ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमध्ये गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आले आहेत. याप्रकरणी राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा, नीरज बोकील, पोहेकॉ. जायभाय, पोना. अमित राठोड, पोकॉ. आजिनाथ पाखरे, सचिन ताजणे, नदीम शेख, अमोल पडोळे, महेंद्र गुंजाळ, आदिनाथ चेमटे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Visits: 205 Today: 1 Total: 1949725

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *