खंदरमाळच्या बर्डे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची मदत यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून केले वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील खंदरमाळच्या बर्डे कुटुंबातील चार मुलांचा काही दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यृ झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.21) माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून बर्डे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.

थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्यासह आदी ग्रामस्थांनी या बर्डे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी संचालक थोरात म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुका हे आपले कुटुंब आहे या भावनेने ते काम करत असतात आणि या कुटंबामध्ये मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे या बर्डे कुटुंबियांना आधार देण्यासाठी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बाळासाहेब थोरात यांनीही भेटी दिल्या आहेत त्यांनीच ही मदत पाठवली आहे. ज्या काही शासकीय अडचणी आल्या होत्या त्यासाठी आमदार थोरात यांनी पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर हा जो रस्ता आहे. त्याचीही आपण डागडुजी कारखान्यामार्फत लवकरच केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी खंदरमाळचे सरपंच शिवाजी फणसे, अकलापूरचे सरपंच अरूण वाघ, मातोश्री कलेक्शनचे सुधीर शेळके, जयराम ढेरंगे, संपत आभाळे, पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब कुर्हाडे, आदिवासी सेवक बाबा खरात, दत्तात्रय आभाळे, विक्रम कजबे, रमेश गपले, अक्षय ढोकरे आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
