वांबोरी येथे व्यापार्यावर धारदार शस्त्राने हल्ला व्यापार्यांनी मोर्चा काढून बाजारपेठ ठेवली बंद

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील वांबोरी बाजारपेठेतील किराणा व्यापारी शैलेंद्र वसंतलाल कटारिया यांच्यावर वांबोरी येथील एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न मंगळवारी सायंकाळी केला. या घटनेचा निषेध म्हणून वांबोरीतून बुधवारी (ता.28) सकाळी दहा वाजता मोर्चा काढून बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सदर घटनेमुळे वांबोरी बाजारपेठेतील व्यापारी भयभीत झाले आहेत.

वांबोरीतील राहुरी वेस परिसरात राहणार्या एका तरुणाने माझ्या मित्राच्या कामाचे पैसे तू का देत नाही असे शैलेंद्र वसंत कटारिया यांना म्हणाला. त्यास शैलेंद्र कटारिया यांनी त्याच्या हमालीच्या पैशाचा आणि तुझा काय संबंध अस कटारिया म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपीने धारदार सत्तूरच्या सहाय्याने वार करून शैलेश कटारिया यांना प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये शैलेश कटारिया यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तत्काळ अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुभाष पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे माजी सरपंच नितीन बाफना, किसन जवरे, पोपट देवकर, राजेंद्र भराडिया, विशाल पारख, सुनील बोथरा, डॉक्टर अतुल झंवर, हेमंत मुथा, विजय झंवर, बाळासाहेब मुनोत, सत्यनारायण बिहाणी, दीपक गांधी, नीलेश पारख, अजित कोठारी, डॉक्टर संदीप जवरे, सूरज भोमा आदिंसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
