लोकनेते बाळासाहेब थोरात गौरव पुरस्काराने 25 शिक्षकांचा सन्मान आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यासह ठाणे, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गुणवत्तेने व प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम करणार्या 25 शिक्षकांचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनाही जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के. बी. दादा सभागृहात जाणीव फाउंडेशनच्यावतीने या पुरस्कारांचे वितरण माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे व कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अजय फटांगरे, फादर विल्सन परेरा, प्रा. बाबा खरात, प्राचार्य हरिभाऊ दिघे, शिक्षण अधिकारी सुवर्णा फटांगरे, आदर्श शिक्षक रावसाहेब रोहकले, बबनराव कुर्हाडे, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे, उपाध्यक्ष संदीप काकड, समन्वयक अंतोन मिसाळ, अॅड. अशोक हजारे, जयराम ढेरंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तांबेे म्हणाल्या, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा शिक्षणाचे मोठे केंद्र बनला आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमधून काम करणारे शिक्षक आपले काम अत्यंत गुणवत्ते व प्रामाणिकपणाने करत आहे. नवी पिढी घडविण्यासाठी अनेक नवी आव्हाने आहेत. मात्र सध्याचे शिक्षक ते पूर्णपणे पेलत आहेत. शिक्षण हे समाज बदलविण्याच्या प्रभावी माध्यमातून ज्ञानदानाचे काम करणार्या या गुणवंत शिक्षकांच्या कामाचा जाणीव फाउंडेशनने केलेला सन्मान हा शिक्षकांच्या जीवनात नक्कीच मोठी ऊर्जा देणारा ठरणार आहे.
कर्करोगतज्ज्ञ डॉ. थोरात म्हणाल्या, लहान मुलांच्या जीवनावर शिक्षकांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. सध्याचे शिक्षक हे अत्यंत आधुनिक पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नवीन पहाट निर्माण करत आहेत. ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे खर्या अर्थाने ईश्वराचे कार्य आहे. संगमनेर तालुक्यात शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. या दर्जेदार शैक्षणिक सुविधांबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याची जाणीव जागृती निर्माण करावी असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी अभिजीत देशमुख (सिन्नर), गणपत हजारे (साकूर), राजेंद्र पाचपुते (खेड, जि. पुणे) बिस्मिल्लाह जैनुद्दीन शेख (संगमनेर), ज्ञानेश्वर सोनवणे (अकोले), डॉ. अतिश कापसे (बोटा), दत्तात्रय जठार (केळेवाडी), वैभव सांगळे (अहमदनगर), स्वप्ना वाघमारे (अहमदनगर), मालू आभाळे (मुंजेवाडी), प्रीती ठोंबरे (आंबी दुमाला), गणेश कहांडळ (उकडगाव, ता. कोपरगाव), देवेश सांगळे (तळवाडा, शहापूर, जि. ठाणे), सतीश गोरडे (सिन्नर), शिवाजी चत्तर (पळसखेडे), सोमनाथ घुले (पिंपळगाव माथा), प्राचार्य हरिभाऊ दिघे (तळेगाव दिघे), दत्तात्रय हेंद्रे (राहुरी), चांगदेव काकडे (गागरे वस्ती), दत्तू थिटे (डोळासणे), प्रकाश पारखे (सिद्धार्थ विद्यालय), गुलशन जमादार (साकूर), आनंदा मधे (बोटा), सत्यानंद कसाब (वडगाव पान), मच्छिंद्र मंडलिक (निमोण), सुनीता गडदे (चिपाची ठाकरवाडी), राजू आव्हाड (सुकेवाडी), भाऊसाहेब यादव (ज्ञानमाता विद्यालय), राजेश वाकचौरे (संगमनेर खुर्द) तर प्रा. बाबा खरात यांना आदिवासी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जाणीव फाउंडेशनचे भाऊसाहेब काकड, राजेंद्र गोडगे, रमेश रुपवते, पोपट दिघे, बाळासाहेब मुर्तडक, सुनील अभियेकर, सुधीर गडाख, बाळासाहेब कांडेकर, वसंत बोडखे, अशोक साळवे, कुंडलिक मेंढे, बाळासाहेब काकड, हर्षल हेंद्रे, निकिता हेंद्रे, प्रकाश पारखे, अशोक कांडेकर, सत्यानंद कसाब यांनी विशेष परिश्रम घेतले.