गुरव समाज संघटेनेचे विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
गुरव समाज संघटेनेचे विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनातून विविध मागण्या करण्यात आल्या असल्याची माहिती संघटनेचे मानद अध्यक्ष वसंत बंदावणे यांनी दिली आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यात गुरव समाजाची 30 लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. हे सगळे लोक सध्या अत्यंत उपेक्षित व हलाखीचे जीवन जगत आहे. त्यात बहुतांश देवाचे पुजारी असून इनाम वर्ग तीनधारक आहेत. कोरोना संकटात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी संघटनेच्यावतीने तीनवेळा आझाद मैदानावर आंदोलने करुन शासनाला निवेदने देण्यात आली. यास किसान सभा व इतर समाजातील सर्व पुजार्यांनी पाठिंबा दिला. परंतु कोणत्याही सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आता तरी शासनाने गुरव समाजाला अर्थसहाय्य करावे, अतिवृष्टीची नुकसान भरपाई इनाम वर्ग तीनधारकांना मिळावी, पीककर्ज उपलब्ध करुन द्यावे, बेकायेदशीर हस्तांतरण व कुळ काढून मूळ सनद धारकांना जमिनी द्याव्यात, परंपरागत पूजा-अर्चाचा हक्क कायम ठेवावा, उद्योग उभारणीसाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, वसतिगृहासाठी जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा, देवस्थान ट्रस्टमध्ये 50 टक्के प्रतिनिधीत्व मिळावे, समाजासाठी कडक कायदा लागू करावा, 60 वर्षांवरील पुजार्यांना निर्वाह भत्ता द्यावा अशा विविध मागण्या राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.अण्णा शिंदे यांसह संघटनेने केल्या आहेत.