उद्धव ठाकरेंचा वाढदिवस सदस्य नोंदणी अभियानाने साजरा संगमनेर शहर शिवसेनेचे अभियान; नागरिकांचा मिळाला प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर शहर शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख अमर कतारी यांनी शिवसेना संघटनेत नवीन सदस्य जोडावे या हेतूने सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन केले होते. आमदार तथा संपर्कप्रमुख सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, विधानसभा संपर्कप्रमुख अजय व्हनोळे, रणजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे सदस्य नोंदणी अभियान आयोजित केले होते.

बंडखोरीच्या मोठ्या घटनेनंतर शिवसेना पुन्हा एकदा जोमाने संघटन वाढवत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इतर कोणतेही कार्यक्रम करण्यापेक्षा शिवसेनेत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यादृष्टीने संगमनेर बसस्थानक परिसरात सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात व जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना शहरप्रमुख अमर कतारी यांनी पक्षातील गद्दारी करणार्या बंडखोरांचा तीव्र शब्दांत निषेध करत भविष्यात गद्दारांना निवडणुकीत धूळ चारूच असा निश्चय व्यक्त केला. तसेच अजूनही तळ्यात मळ्यात असलेल्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास नसलेल्या खोट्या शिवसैनिकांनी देखील पक्षातून चालते व्हावे, शिवसेना भक्कमपणे उभी करण्यास तमाम शिवसैनिक समर्थ आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी शहरासह तालुक्यात व ग्रामीण भागात शिवसेना जोमाने पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेले उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे व पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागातील ज्येष्ठ व युवक नागरिकांना शिवसेनेचे सदस्यत्व प्राप्त करून दिले. कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख यांनी मुस्लिम समाजातील जनता तसेच कामगार व कष्टकरी जनता ही येणार्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच शिवसेनेचे शाखाप्रमुख व मुस्लिम मावळे अजीज मोमीन आणि उपशहरप्रमुख इम्तियाज शेख यांनी अधिकाधिक संख्येने मदिनानगर, अलकानगर, मोमीनपुरा परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिकांना सदस्य नोंदणीत सहभागी केले. मोमीनपुरा परिसरातील महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे शिवसेनेचे सभासदत्व स्वीकारले.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, कामगार सेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख, नागपूर संपर्कप्रमुख नरेश माळवे, पंचायत समिती विरोधी पक्षनेते अशोक सातपुते, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, दीपक साळुंके, विकास ढमाले, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब कवडे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहरप्रमुख अमोल डुकरे, उपशहर प्रमुख फैसल सय्यद, युवासेना विधानसभा समन्व्यक अक्षय बिल्लाडे, सुदर्शन इटप, दानिश खान पारवे, अजीज मोमीन, फाइक शेख, इमरान सय्यद, वैभव अभंग, विद्यार्थी सेनेचे सचिन साळवे, रिक्षा सेनेचे बढे, भांडकर, पोपळघट, महिला आघाडीच्या आशा केदारी, संगीता गायकवाड, सुरेखा गुंजाळ, अक्षय गाडे, राजाभाऊ सातपुते, कार्यालयीन प्रमुख अनुप म्हाळस, विभाग प्रमुख फिरोज कतारी, त्रिलोक कतारी, प्रकाश चोथवे, प्रलोक कतारी, मनोज खजुरे, प्रशांत खजुरे, नारायण पवार, रंगनाथ फटांगरे, विजय सातपुते, सचिन खुळे, जयदेव यादव, जोशी, शरद कवडे, संभव लोढा, ब्रम्हा खिडके, गौरव चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.
