हैदराबादच्या साईभक्ताकडून 40 लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण साईबाबांना केलेल्या नवसाची फेड म्हणून अर्पण केला मुकुट

नायक वृत्तसेवा, शिर्डी
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. असंख्य भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरुन दान देत असतात. यातच नव्याने भर पडली असून हैदराबाद येथील डॉ. रामकृष्णा मांबा यांनी सुमारे 40 लाख रुपये किंमतीचा 742 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट शुक्रवारी (ता.22) अर्पण केला आहे.

दरम्यान, अडीच हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी तसेच सोने-चांदीचा खजिना असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या झोळीत दिवसेंदिवस भक्तांकडून भरभरून दान प्राप्त होत असून श्री साईंच्या खजिन्यात वाढ होत आहे. शुक्रवारी मध्यान्ह आरतीला हैदराबाद येथील डॉ. रामकृष्ण मांबा आणि रत्ना मांबा यांच्या परिवाराने हजेरी लावून श्री साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी 1992 साली साईबाबांना केलेल्या नवसाची फेड म्हणून पाऊण किलो वजनाचा सुवर्ण मुकुट साईचरणी अर्पण केला.

याप्रसंगी निमगाव येथील साईनिवाराचे योगेश तिय्या, स्वप्नील शिंदे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. रामकृष्ण मांबा म्हणाले की, माझी श्री साईबाबांवर अतूट श्रद्धा असून बाबांकडे जे काही मागितले त्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी गुरुपौर्णिमा उत्सवातही साईबाबांच्या झोळीत पाच कोटींपेक्षा अधिक दान जमा झाले होते. त्यानंतर आता 40 लाख रुपयांचा सुवर्णमुकुट श्रींच्या चरणी डॉ. मांबा यांनी अर्पण केला आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 114940

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *