दोन गटांत वाद; कोतूळमध्ये कडकडीत बंद! नुपूर शर्मा प्रकरणी चौघा तरुणांना अटक; हिंदुत्ववादी संघटनांकडून अटकेचा निषेध

नायक वृत्तसेवा, अकोले
मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह व्यक्तव्य करणार्‍या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट समाज माध्यमावर टाकल्याबद्दल आणि व्हाट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवल्याबद्दल कोतूळ (ता.अकोले) येथे दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. यामुळे गावात रविवारी (ता.19) कडकडीत बंद पाळण्यात आला.

नुपूर शर्मा प्रकाराबद्दल कोतूळ गावातील एका गटातील चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्याबाबत दुसर्‍या गटाने पोलिसांकडे तगादा लावला. मात्र, गुन्हा दाखल होण्यास उशीर होत असल्याने अकोले, संगमनेर, राजूर, श्रीरामपूर व अहमदनगर येथून जमाव गोळा झाला आणि गुन्हा दाखल झाला. यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. तत्पूर्वी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केल्याने गावाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यानंतर चौघा तरुणांना पोलिसांनी अटक केल्याने रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी मूक मोर्चा काढून अटकेचा निषेध नोंदवत बंदची हाक दिली.

दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी दोन्ही गटातील समाजाशी चर्चा करुन शांततेचे आवाहन केले. याचबरोबर भाजप नेते सीताराम देशमुख, राजेंद्र देशमुख, प्रदीप भाटे, विनोद देशमुख, किरण देशमुख, विनोद देशमुख, मनोज लोखंडे, विजय पवार, गणेश पोखरकर, अश्पाक काजी, शगीर काजी, परवेश शेख यांनीही दोन्ही समुदायातील नागरिकांना शांततचे आवाहन केले. मात्र, रविवारी सांयकाळपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता व्यापार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला.

Visits: 202 Today: 1 Total: 2122870

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *