भोजदरी येथे सलग समपातळी चरांच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा वन विभागाकडे पाठपुरावा

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी येथे वन विभागाच्यावतीने सलग समपातळी चराच्या (सीसीटी) कामांचे रविवारी (ता.19) भूमिपूजन करण्यात आले. यामुळे वनसंपदा संवर्धनासाठी मोठा फायदा होणार आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतच्यावतीने भोजदरी येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या कामाबाबत निवेदन देण्यात आलेले होते.

सदर निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री आठवले यांचे स्वीय सहायक प्रवीण मोरे यांनी पाठपुरावा केल्यामुळे वन विभागाने लवकरच काम सुरू करत असल्याचे मंत्री आठवले यांच्या कार्यालयाला कळविले. त्यानुसार रविवारी सलग समपातळी चराच्या कामाचा शुभारंभ झाला. या कामाचा ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, वन विभाग अधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या चरांमुळे पाणी डोंगरात जिरते व पाणथळ जागा निर्माण होण्यास मदत होते.

दरम्यान, शासनाच्या पाणी अडवा पाणी जिरवा या अभियानांतर्गत हा कार्यक्रम संगमनेर विभागातील सर्व डोंगरावर राबविणार असल्याचा मनोदयही वन विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला. यावेळी वकील आशा लांडगे, वनाधिकारी रामदास थेटे, सरपंच शिल्पा पोखरकर, पोलीस पाटील गणपत हांडे, शरद तपासे, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब उगले, सोसायटी अध्यक्ष शिवाजी वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मते, मंगेश सावंत, बबन मते, विकास हांडे, नामदेव हांडे, भास्कर भारती, रवींद्र लांडगे, प्रदीप लांडगे, सुनील लोहाटे, दिनेश लांडगे, हिरामण तपासे, सुमित लांडगे, जिजाभाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *