मुळा धरणावर पावसाची विश्रांती
मुळा धरणावर पावसाची विश्रांती
नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणावर पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची 886 क्युसेकने सुरू आहे. तर जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे.

26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात 25 हजार 797 दशलक्ष घनफूट म्हणजेच 99.21 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा 21 हजार 297 दशलक्ष घनफूट इतका आहे. कोतूळ येथे आजपर्यंत 776 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे 972 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, सध्या धरणावर पाऊस थांबला आहे. त्यामुळे सध्याचा 25 हजार 797 दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून उर्वरित येणारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाचा अंदाज व मधल्या भागातील आवक लक्षात घेऊन पाणी किती कमी करायचे याचा निर्णय घेण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी सांगितले.

