‘हेड अ‍ॅण्ड नेक ऑन्कोलॉजी’वर चर्चासत्र संपन्न ‘टाटा मेमोरिअल सेंटर’ आणि ‘एसएमबीटी’चा उपक्रम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये (ता. इगतपुरी, धामणगाव-घोटी खुर्द) नुकतेच ‘हेड अ‍ॅण्ड नेक ऑन्कोलॉजी’ या विषयावर एक दिवसीय कन्टिन्युइंग मेडिकल एज्युकेशन (सीएमइ) चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

तीन सत्रात आयोजित या चर्चासत्रात कर्करोगतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन, डॉ. शिवा कुमार, डॉ. विजय पाटील व पॅथॉलॉजिस्ट डॉ. स्वप्नील कर्णिक आदिंनी मार्गदर्शन केले. कर्करोग संदर्भाने प्रगत तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रक्रिया यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. सीएमइ ही क्रेडीट पॉईंटसाठी आयोजित केली गेलेली कार्यशाळा आहे. यावेळी एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्या विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच प्रशिक्षणार्थी असे एकूण 93 डॉक्टर्स उपस्थित होते.

टाटा मेमोरिअल सेंटरमधील कर्करोगतज्ज्ञ डॉ. हसमुख जैन यांनी ‘हेड अ‍ॅण्ड नेक ऑन्कोलॉजीमधील प्रगती’ यावर भाष्य केले, तर डॉ. विजय पाटील यांनी हेड अ‍ॅण्ड नेक स्क्वेमस सेल सर्सिनोमामध्ये निओड्जुवन्ट केमोथेरमी या विषयावर सविस्तर चर्चा केली. हेड अ‍ॅण्ड नेक ऑन्कोलॉजी या विषयावर सर्वसमावेशक दृष्टीकोन मांडत पॅनेलसह चर्चा देखील करण्यात आली. ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सर, लंग कॅन्सर, ब्रेन ट्यूमर हे कर्करोगाचे काही प्रमुख प्रकार आहेत. कर्करोगावरील उपचारांसाठी जगभर नावाजलेल्या टाटा मेमोरिअल सेंटरच्या तांत्रिक सहकार्यातून एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कर्करोगांवरील उपचारांची सुविधा सुरू करण्यात आली आहे. हा विभाग पूर्णपणे स्वतंत्र असून येथे तज्ज्ञ डॉक्टर हे रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णवेळ उपलब्ध आहेत. तसेच उच्च प्रतीची व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देखील आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये विविध प्रकारच्या कर्करोग उपचारांसाठी रुग्ण येतात. कॅन्सरवरील उपचारांबरोबरच येथे शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेल्या एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्यूमध्ये आत्तापर्यंत केवळ 8 महिन्यांमध्ये 202 शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

Visits: 124 Today: 1 Total: 1104167

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *