मेडिकव्हर हॉस्पिटलकडून उच्च रक्तदाबाची तपासणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे (वर्ल्ड हायपरटेन्शन डे) औचित्य साधून संगमनेरातील मेडिकव्हर हॉस्पिटलने स्वयंसेवकांद्वारे संशोधन केले. यामध्ये सुमारे 1400 लोकांच्या तपासणीनंतर रिअल टाईम संशोधनाद्वारे काही आकडेवारी समोर आली असून, 30 टक्के लोक उच्च रक्तदाबाचे आढळले. तर 20 टक्के रुग्ण अतिउच्च रक्तदाबाचे आणि 50 टक्के लोक निरोगी आढळून आले आहेत.

मेडिकव्हर हॉस्पिटलमधील स्वयंसेवकांनी 13 ते 17 मे याकाळात संगमनेरमधील इंदिरानगर, चैतन्यनगर, राजपाल, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मालपाणी बजाज शोरूम, पद्मावती शोरूम, संगमनेर टेक्स्टाईल, चंद्रशेखर चौक, वाडेकर गल्ली, रंगारगल्ली, गणेशनगर, गंगामाई घाट आणि मालपाणी हेल्थ क्लब या सर्व ठिकाणी जाऊन विविध लोक आणि कर्मचार्‍यांची तपासणी केली. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. चेतन जैन यांच्या मते कार्डियोलॉजी विभागाला भेट देणारे 70 ते 80 टक्के रुग्ण हायपर टेंशनचे आहेत. हायपर टेन्शनची सध्याची स्थिती हिमनगाचे टोक आहे. हिमनगाचे टोक म्हणजे योग्य काळजी न घेणारे आणि निदान झाल्यानंतर सुद्धा औषधे लिहून दिल्यानंतर ते त्यांच्या बीपी पातळीच्या नियमित फलक निरीक्षणाच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. बीपीची पातळी 140/90 पेक्षा कमी ठेवणे हे अंतिम ध्येय आहे. यासाठी दररोज निरीक्षण करणे आणि वेळेवर काळजी घेणे आवश्यक आहे. लोकांना नियमित तपासणी आणि त्यांच्या आरोग्याचे स्थितीवर लक्ष ठेवण्याबद्दल जागृत करणे गरजेचे आहे. जागतिक उच्च रक्तदाब दिन 2022 ची थिम ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुषी जागा अशी आहे’, ही थिम रक्तदाबाचे नियमित निरक्षण करण्याचे महत्त्व स्पष्ट करत आहे. तसेच जनरल फिजिशियन डॉ.सुशांत गिते यांनी नियमित बीपी तपासणीचे काही फायदे सांगितले.

Visits: 9 Today: 1 Total: 80182

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *