श्रीरामपूरमध्ये गावठी कट्ट्यासह एकास पकडले दोन जिवंत काडतुसांचा समावेश; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील बीफ मार्केट परिसरात विनापरवाना शस्त्रे घेवून फिरत असलेल्या एकास नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून नुकतेच पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बीफ मार्केट परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, देवेंद्र शेलार, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रवींद्र घुंगासे, रोहित येमूल, मेघराज कोल्हे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांच्या पथकाने सापळा लावला.

त्यानंतर काही वेळातच एक संशयित इसम बीफ मार्केट परिसरात फिरताना दिसला. त्यावेळी पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदारांनी त्यास घेराव घालून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत एक गावठी बनावटी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गु. र. नं. 268/2022, नुसार अंजर इलियाज शहा (वय 22) याच्याविरुद्ध भादंवि कलम आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

Visits: 93 Today: 1 Total: 1115048

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *